टॅंकरच्या धडकेत महिला जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

दुचाकीस्वाराला टँकरने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला ठार झाल्याची घटना सोमवारी (ता. 24) दुपारी तीन वाजेदरम्यान औरंगाबाद-नाशिक मार्गावरील देवगांव रंगारीजवळ (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असलेल्या खडकीपुलाच्या वळणावर घडली.
 

देवगांव रंगारी : दुचाकीस्वाराला टँकरने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला ठार झाल्याची घटना सोमवारी (ता. 24) दुपारी तीन वाजेदरम्यान औरंगाबाद-नाशिक मार्गावरील देवगांव रंगारीजवळ (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असलेल्या खडकीपुलाच्या वळणावर घडली.

मृत महिलेचे आशाबाई बाबासाहेब कनगरे (वय 64) असे नाव आहे. सोमवारी दुपारी शिवगांव (ता.वैजापूर) येथील बाबासाहेब एकनाथ कनगरे हे देवगांव रंगारी येथे आठवडे बाजार करण्यासाठी आले होते.बाजारात खरेदी करुन दुचाकीवरून (एम.एच. 20 ए एक्स 9472) आपली पत्नी आशाबाईला सोबत घेवुन गांवाकडे चालले असतांना खडकी पुलाच्या वळणावर येताच मागुन आलेल्या भरधाव वेगाने आलेल्या टँकरने (एम.एच.20-5732) दुचाकीला मागून जोराची धडक दिली.

यामध्ये आशाबाई दुचाकीवरून खाली कोसळल्या. त्यावेळी ते टँकरच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद देवगांव रंगारी पोलीस ठाण्यात करण्यात आली. अधिक तपास खुळे पाटील, योगेश थोरात करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The woman was killed on the spot in Accident