महिला उसाच्या शेतात गेली, मग तो बळजबरी घुसला...बीड जिल्ह्यातील घटना

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

एक महिला ही घराशेजारी असलेल्या उसाच्या शेतात सोमवारी सकाळी शौचास जात असताना विष्णू हनुमंत घुले याने तिच्या मागे जात विनयभंग केला. तिने आरडाओरड करताच तिचे आई-वडील धावत आले.

केज (जि. बीड) -  तालुक्यातील शिरपुरा येथील एक महिला उसाच्या शेतात शौचास जात असताना तिचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (ता. चार) सकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

तालुक्यातील शिरपुरा येथे एक महिला ही घराशेजारी असलेल्या उसाच्या शेतात सोमवारी सकाळी शौचास जात असताना विष्णू हनुमंत घुले याने तिच्या मागे जात विनयभंग केला. तिने आरडाओरड करताच तिचे आई-वडील धावत आले. हा प्रकार विष्णू घुले यांच्या घरच्यांना माहिती होताच मनात राग धरून त्यांनी पीडिता व तिच्या आई-वडिलांना मारहाण केली.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

दरम्यान, मागील आठ दिवसांपूर्वी देखील या नराधमाने या महिलेला पाहून तिच्या पाठीमागे दुचाकी नेऊन हॉर्न वाजविणे व माझ्या गाडीवर बस असे म्हणून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात विष्णू हनुमंत घुले व त्याचे आई-वडील अशा तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसनाईक दिनकर पुरी हे करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The woman went to the sugarcane field, then he forcibly entered