आदर्श पाटोदा गावातील महिलाचा डिजिटल बॅंकेकडे ओढा

प्रकाश बनकर
सोमवार, 1 जुलै 2019

- गावातील सातेशहून अधिक महिला पुरुषांनी उघडली पोस्ट बॅंकेत खाते 

औरंगाबाद : अनेक पुरस्कारांवर मोहेर उमटवणाऱ्या आदर्श पाटोदा गावाची वाटचाल डिजिटल गावाकडे सुरु झाली आहे. गावातील घरा-घरावर महिलांचे नाव लागल्यानंतर महिलांनासह दहा वर्षांवरील मुलांना बॅंकिग कळावते यासाठी भारतीय पोस्ट बॅंकेच्या माध्यमातून खाते उघडली जात आहे. आतापर्यंत सातशे खाते उघडण्यात आली आहे. यात 450 हून अधिक महिलांची संख्या आहे. 

संत गाडगे बाबा अभियानात राज्यात प्रथम असलेले निर्मलग्राम पाटोदा गावाची ओळख देशभरात आदर्श गाव म्हणून आहे. याच गावातील महिलांना बॅंकेचा व्यवहार कळावा,व्यवहारातील देवाण-घेवाण स्वत: करता यावी याच उद्देशाने हालचाली करण्यात आली. यासाठी भारतीय पोस्ट बॅंकेने पुढकार घेतला.

गेल्या दोन दिवसापासून पाटोदा गावात पोस्टल बॅंकेच्या अंतर्गत खाते उघडण्यात येत आहे. या बॅंकेचा माध्यमातून गावातील महिल व मुलांना बॅंकेत होणारे व्यवहाराची माहिती मिळेल. तसेच प्रत्यक्षात व्यवहार करता येईल. म्हणून सरपंच भास्करराव पेरे यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीत खाते उघडत आहे. गावातील शिक्षित महिलांना बॅंकेचा व्यवहार या माध्यमातून करता यईल. गावातील 3350 लोकसंख्या पैकी प्रत्येकांचे बॅंकेचे खाते उघडणार असल्याचे गावचे संरपंच पेरे यांनी सांगितले. 

गावातील गरीब जनतेला विशेष करून महिलांना पैसा या बॅंकेच्या माध्यमातून पैसाचा व्यवहार करता येईल. महिलांसह शाळकरी मुलांनाही बचतीसाठी या बॅंकेचा उपयोग होईल. पोस्टल बॅंकेतर्फे गावात एक एटीएम लावावेत. या एटीएममध्यून केवळ दोन हजार रुपयापर्यंत रक्‍कम निघण्याची मर्यादा ठेवावी.यामूळे गावातील महिलांना स्वत: व्यवहार करता येईल. पोस्ट बॅंकेने घेतलेल्या पुढाकाराचे आम्ही स्वागत करतो. - भारस्कराव पेरे, सरपंच, आदर्श पाटोदा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women of adarsh Patoda village lean towards the digital bank