फूक मारून आणायला गेली अन्‌ बेपत्ता झाली

Sana-and-Arhan
Sana-and-Arhan

औरंगाबाद - ‘मुलाची तब्येत ठीक नाही, चेलिपुरा येथून मुलाला फूक मारून आणते,’ असे सांगून घराबाहेर गेलेली महिला मुलासह बेपत्ता झाली. हा प्रकार सोमवारी (ता. २२) सायंकाळी पाचच्या सुमारास हर्षनगर भागात समोर आला. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सना शेख साबेर (वय २५, रा. जवखेडा, ता. कन्नड) व अरहान शेख साबेर (वय दोन) अशी बेपत्तांची नावे आहेत. सना ही जवखेडा (ता. कन्नड) येथे पतीसोबत राहते. लग्नसमारंभासाठी पंधरा दिवसांपूर्वी ती मुलगा अरहानला घेऊन माहेरी हर्षनगर येथे आली होती. मुलाची प्रकृती ठीक नसल्याने ती मुलाला फूक मारून आणते, असे माहेरच्या कुटुंबीयांना सांगून निघून गेली; परंतु मुलगा व ती दोघही घरी परतले नाहीत.

कुटुंबीयांनी दोघांचा शोध घेतला; मात्र ते न सापडल्याने मंगळवारी (ता. २३) सिटी चौक ठाण्यात तक्रार दिली. सनाची चार फूट सहा इंच उंची असून, गोरा रंग आहे. तिने अंगात लाल रंगाचा सलवार व आकाशी रंगाची ओढणी परिधान केली आहे. तिला चष्मा असून, सोबत मुलगा अरहान आहे. दोन वर्षे वय, अंगात चॉकलेटी बनियन, जिन्सपॅंट असे अरहानचे वर्णन आहे. दोघांबाबत माहिती असल्यास सिटी चौक ठाण्यात ०२४० २२४०५५१ या क्रमांकावर, तसेच तपास अधिकारी डी. पी. भताने यांना ९८२३२०३७३७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com