महिला व बालकल्याणच्या सभापतींसह तिघांविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

उस्मानाबाद - "बेटी बचाओ, बेटी पढाओ'चे बॅनर निकृष्ट दर्जाचे बनविले असल्याची तक्रार न करण्यासाठी व या कामात चौकशी न लावण्यासाठी एकूण बिलाच्या पाच टक्‍क्‍यांप्रमाणे लाचेची मागणी करणाऱ्या महिला व बालकल्याण सभापती लता अनिल पवार, त्यांचा स्वीय सहायक पांडुरंग वेदपाठक व मेडिकल दुकानदार अण्णासाहेब माडेकर यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस उपअधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे "बेटी बचाओ, बेटी पढाओ' उपक्रमाचे बॅनर तयार करण्यासाठी तक्रारदाराला नोव्हेंबर 2016 मध्ये ई-टेंडर मिळाले होते. त्यानुसार दोन हजार 476 बॅनरचा पुरवठा करण्याचे काम होते. त्यांनी ही ऑर्डर 26 फेब्रुवारी 2017 मध्ये पूर्ण केली होती. ऑर्डरचे 11 लाख 66 हजार 815 रुपयांचे बिल चेकद्वारे त्यांना 28 फेब्रुवारी मिळालेले होते. तक्रारदाराने तयार केलेले बॅनर निकृष्ट दर्जाचे बनविले असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे न करण्यासाठी व या प्रकरणात चौकशी न लावण्यासाठी म्हणून एकूण बिलाच्या पाच टक्‍क्‍यांप्रमाणे तक्रारदाराकडे सभापती लता अनिल पवार व पांडुरंग वेदपाठक यानी लाचेची मागणी करून लाचेची रक्कम (ता.23 ) घेऊन येण्यास सांगितले. या माहितीची तक्रार नोंदवून गुरुवारी (ता. 23) पोलिस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यानी त्यांच्या पथकातील सहकाऱ्यांच्या सहाय्याने लता पवार, पांडुरंग वेदपाठक यांच्या लाचेची मागणीची पडताळणी केली असता ती निष्पण्ण झाली. श्री. वेदपाठक यांनी 22 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारून अण्णासाहेब माडेकर यांच्या मेडिकल दुकानात ठेवण्यास सांगितले. त्यानुसार तिघांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. 

Web Title: Women and Child Welfare in the case against