महिलेस लाथा बुक्क्याने मारहाण

महिलेस लाथा बुक्क्याने मारहाण

जिंतूर : दुचाकीवरून नेताना गाडी रस्त्याच्या बाजूला नेऊन महिलेस लाथा बुक्या व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता.9) सायंकाळी सहाच्या सुमारास डोणवाडा (ता.जिंतूर) शिवारात घडली.

तालुक्यातील वरूड येथील कमलबाई दगडूबा पाथरकर (वय 55) ह्या भाऊबीजेनिमित्त माहेरी मालेगांव (ता.जिंतूर) येथे जाण्यासाठी जिंतूर येथील ऑटो पॉइंटवर उभ्या असताना तेथे एक 30 वर्षीय तरुण आला व म्हणाला मावशी तुम्हाला कुठे जायचे यावर सदर महिलेने मला मालेगांव येथे जायचे असे सांगितले. यावर त्या तरुणाने मला सुद्धा मालेगांवला जायचे आहे. मी मालेगाव येथील सुधाकर थिटे यांचा मुलगा आहे. चला माझ्या गाडीवर असे सांगितले. सदर महिलेने विश्वास करत त्या तरुणाच्या दुचाकीवर बसली व ते मालेगांवच्या दिशेने निघाले.

दुचाकी डोणवाडा पाटिवर आली असता गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन सदर महिलेस शेतात नेऊन तिला मारहाण करत अंगावरील दागिने काढून घेण्याचा प्रयत्न करत होता. महिलेने विरोध करत त्याच्या हाताला चावा घेतला. यावर संतापून त्याने महिलेला डोक्यावर, अंगावर दगडाने, लाथा बुक्क्याने मारहाण करत जखमी केले. महिलेने जीवाच्या आकांताने ओरड केली असता जवळच्या शेतातील लोक धाऊन आले. एव्हाना तो भामटा घटनास्थळावरुन पळून गेला. मालेगाव येथील नातेवाईकांनी त्या महिलेस जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com