महिला उपसरपंचाची छेड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

बीड - राजीनामा देण्यासाठी दबाव टाकत महिला उपसरपंचाची छेड काढल्या प्रकरणी धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव बबन बडे यांच्यासह चौघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड - राजीनामा देण्यासाठी दबाव टाकत महिला उपसरपंचाची छेड काढल्या प्रकरणी धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव बबन बडे यांच्यासह चौघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील एका गावातील महिला उपसरपंचावर राजीनामा द्यावा म्हणून मागील दीड वर्षापासून दबाव आणला जात आहे. राजीनामा देण्यासंदर्भात वारंवार सांगूनही कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने चौघांनी मोबाईलवर व्हॉट्‌सअपद्वारे अश्‍लील शब्दांत बदनामी केली व पाठलाग करून अश्‍लील भाषा वापरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: women deputy sarpanch Tampering crime

टॅग्स