महिलांचा सहभाग ही मराठा समाजाची नवीन जीवनशैली - डॉ. साळुंखे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

अंबाजोगाई - मराठा समाजाच्या मूक मोर्चात दिसणारा महिलांचा मोठा सहभाग ही मराठा समाजाने निर्माण केलेली नवीन जीवनशैली असल्याचे मत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी नुकतेच व्यक्त केले.

मराठा सेवा संघाच्या रौप्य वर्षानिमित्त येथील मुकुंदराज सभागृहात "सकल मराठा संमेलन' झाले. त्या वेळी उद्‌घाटनप्रसंगी डॉ. साळुंखे बोलत होते.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कामाजी पवार होते. डॉ. साळुंखे म्हणाले, ""मराठा समाजाने आपल्या न्याय, हक्‍कासाठी राज्यात 25 ठिकाणी अभूतपूर्व मूक मोर्चे काढले. हे मार्चे जागतिक पातळीवर नवा आदर्श निर्माण करणारे आहेत. या मूक मोर्चाच्या माध्यमातून समाजात निर्माण झालेले ऐक्‍य कायम ठेवावे. कुटुंबातील ऐक्‍यासोबतच समाज व देशाचे ऐक्‍य घेऊन मराठ्यांना देश जोडायचा आहे. मोर्चातून जे ऐक्‍य रस्त्यावर दाखविले ते तेवढ्यापुरतेच मर्यादित राहू न देता विधायक दृष्टिकोन ठेवून इतर समाजाच्या सुख-दु:खात सहभागी व्हा, संवाद वाढवा.''

कामाजी पवार यांनी मराठा सेवा संघाच्या कार्याची माहिती दिली. सेवा संघाने केलेल्या प्रबोधनामुळेच राज्यात जातीय व धार्मिक दंगलीचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. आमची मागणी "ऍट्रॉसिटी' बंद करा अशी नसून, त्याचा गैरवापर थांबवा, अशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: women involve in maratha kranti morcha