esakal | कंटेनर-रिक्षा अपघातात नाशिकच्या मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

भरधाव कंटनेर व रिक्षाच्या धडकेत रिक्षातील प्रवासी महिलेचा मृत्यू झाला; तर चारजण गंभीर जखमी झाले.

कंटेनर-रिक्षा अपघातात नाशिकच्या मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - भरधाव कंटनेर व रिक्षाच्या धडकेत रिक्षातील प्रवासी महिलेचा मृत्यू झाला; तर चारजण गंभीर जखमी झाले. शनिवारी (ता. 24) दुपारी तीन वाजता पैठण लिंक रस्त्यावरील कांचनवाडी येथे हा अपघात झाला. लीलाबाई प्रल्हाद दावरे (वय 50) असे मृताचे नाव असून, शीतल गौतम दावरे (32), आरुषी (6), आराध्या (8, सर्व रा. ज्ञानेश्‍वरनगर, नाशिक) व सुशील खेडेकर (वय 25, रा. औरंगाबाद) हे जखमी झाले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील लीलाबाई यांचा मुलगा गौतम हा नोकरीनिमित्त चितेगावात राहतो. त्यांना भेटण्यासाठी लीलाबाई यांच्यासह गौतमची पत्नी व दोन मुली काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडे आल्या होत्या. भेट झाल्यानंतर त्या शनिवारी नाशिकला परत जाणार होत्या. त्यासाठी दुपारी रेल्वेस्टेशनकडे जाण्यासाठी रिक्षातून निघाल्या होत्या.

आई, पत्नी, मुलींना रिक्षात बसवून गौतम त्याच्या दुचाकीने रेल्वेस्टेशनकडे निघाले. कांचनवाडीजवळील मुंबई हायवे टी-पॉइंटजवळ एएस क्‍लबकडे जाणाऱ्या कंटेनरने (सीजी 04, एमक्‍यू 0872) रिक्षाला धडक दिली. धडकेत गंभीर जखमी झालेल्या सर्वांना गंभीर अवस्थेत स्थानिकांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, लीलाबाई यांचा मृत्यू झाला. 

loading image
go to top