अपघातात महिला पोलिस ठार; दुचाकी व ट्रकचा अपघात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

ते दोघेजण दुचाकीवरून येत असतांना अटकळी पाटीजवळ पाठीमागून येणाऱ्या कंटेनरचा हॅंडलला धक्का लागला. यात श्रीमती बोरुळे या मागच्या टायरखाली आल्याने चिरडून ठार झाल्या.

नांदेड - रामतिर्थ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कमल बोरुळे वय 46 (ब. न. 2035) या दुचाकी व कंटेनरच्या धडकेत ठार झाल्या. ही घटना नरसी ते देगलूर रस्त्यावर अटकळी येथे शनिवारी (ता. 2) रात्री 10 च्या सुमारास घडली. या अपघातात सेवानिवृत्त पोलिस जखमी झाला. 

रामतिर्थ पोलिस ठाण्यातून नुकतीच सर्वसाधारण बदलीमध्ये कमल बोरुळे यांची नायगाव ठाण्यात बदली झाली होती. परंतु त्यांना तेथून सोडण्यात आले नव्हते. शनिवारी आपले कर्तव्य बजावून देगलूर मार्गे हाळणी (ता. मुखेड) येथे माहेरी जाण्यासाठी रात्री आठच्या सुमारास निघाल्या. देगलूर येथे गेल्यानंतर हाळणी जाण्यासाठी एकाही वाहन नव्हते. त्यामुळे त्या परत रामतिर्थला येण्यासाठी रस्त्यावर थांबल्या. यावेळी त्यांचे जुने सहकारी सेवानिवृत पोलिस लक्ष्मण बुडगुलवार हे आपल्या गाडीत पेट्रोल टाकून घराकडे परत जातांना त्यांना श्रीमती बोरुळे दिसल्या. त्यांनी त्यांना विचारपूस केली. वाहन कुठलेच आता या वेळेत मिळणार नसल्याने बोरुळे यांनी त्यांना सोडण्याची विनंती केली. ते दोघेजण दुचाकीवरून येत असतांना अटकळी पाटीजवळ पाठीमागून येणाऱ्या कंटेनरचा हॅंडलला धक्का लागला. यात श्रीमती बोरुळे या मागच्या टायरखाली आल्याने चिरडून ठार झाल्या. अशी माहिती रामतिर्थचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी दिली. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Women policemen died in an accident