महिला धोरणात होणार बदल - फौजिया खान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

पहिल्या महिला धोरणाच्या रौप्य वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने महिला धोरणाची नव्याने आखणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरातून सूचना, अपेक्षित बाबी मागविण्यात येत आहेत. नवीन बदलाचा मसुदा तयार करून तो राज्य सरकारला मंजुरीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा, प्रतिष्ठानच्या येथील निमंत्रक, माजी राज्यमंत्री फौजिया खान यांनी आज येथे दिली.

परभणी - पहिल्या महिला धोरणाच्या रौप्य वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने महिला धोरणाची नव्याने आखणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरातून सूचना, अपेक्षित बाबी मागविण्यात येत आहेत. नवीन बदलाचा मसुदा तयार करून तो राज्य सरकारला मंजुरीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा, प्रतिष्ठानच्या येथील निमंत्रक, माजी राज्यमंत्री फौजिया खान यांनी आज येथे दिली.

खान म्हणाल्या, की धोरणामुळे आज सर्वच क्षेत्रांत महिला सक्षमपणे कार्यरत आहेत. मुलींचे साक्षरतेचे प्रमाण वाढून विविध क्षेत्रांत त्यांना संधी मिळाली आहे. १९९४ नंतर २००१ मध्ये आणि २०१४ मध्ये असे तीन वेळेस महिला धोरण राबविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Policy Changes fauzia khan