महिलांनी गाव विकासात सजग राहून काम करावे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

जरंडी : महिलांनी गाव विकासात झोकून स्त्री जातीचा आदर्श निर्माण करावा. महिलांना ग्रामीण भागातून पुढे जाण्यासाठी शासन पातळीवर महत्वाकांक्षी निर्णय घेतले जात असतांना, याचा आधार घेत महिलांनी पुढे जावे. परंतु त्यात कायद्याची काटेकोरपणाने अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी मंगळवारी सोयगावला महिला कायदे व कारभार प्रशिक्षण कार्यशाळेत केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका मनीषा चौधरी होत्या. तहसीलदार छाया पवार यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी नगरसेविका वर्षा मोरे, वंदना बनकर, तहसीलदार छाया पवार, प्रकल्प अधिकारी रुक्मिणी पारधे, वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक सुजित बडे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सूत्र संचालन मीनाक्षी बिरादार यांनी केले. ग्रामीण भागातील महिला कारभारनी. महिला सरपंच, महिला बचत गट आणि महिला सदस्य यांचेसाठी एकात्मिक कृषी संस्थेच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पोलीस निरीक्षक सुजित बडे यांच्या नेतृत्वाखाली गाव विकासासाठी व महिलांच्या सक्षमीकरण करण्यासाठी महिलांनी शपथ घेतली. कार्यक्रमासाठी तालुक्यातील; महिला सरपंच, बचत गटाच्या अध्यक्षा, महिला सदस्य आदींची उपस्थिती होती. यावेळी सुरेखा तायडे, संगीता इंगळे, अनिता महाले, संगीता गायकवाड, आदींसह महिलांची उपस्थिती होती. आभार जिल्हा संघटिका संगीता गायकवाड यांनी मानले.

Web Title: Women should work in the development of villages