बाळाला दूध पाजता येत नसल्याने आईची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

किल्लारी - आपल्याला काहीतरी भयंकर आजार असल्याच्या संशयावरून तीन महिन्यांच्या तान्हुल्याच्या मातेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कारला (ता. औसा) येथे घडली. 

किल्लारी - आपल्याला काहीतरी भयंकर आजार असल्याच्या संशयावरून तीन महिन्यांच्या तान्हुल्याच्या मातेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कारला (ता. औसा) येथे घडली. 

कारला येथील व्यंकट विश्वनाथ सोनटक्के यांची मुलगी गोकर्णा (वय २४) हिचे लग्न आकोला (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील बाबूराव सलगार यांच्याशी झाले होते. पहिल्या बाळांतपणासाठी ती माहेरी आली होती. बाळ तीन महिन्यांचे झाले तरी त्याला दूध पाजता येत नव्हते, स्तनाला गाठी आल्या होत्या. आपल्याला काहीतरी भयंकर रोग झाला आहे, हा संशय मनात धरून बाळाला घरीच ठेवून ती रविवारी सायंकाळी घराबाहेर पडली आणि विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रात्री तिच्या घरच्यांनी शोधाशोध केली; मात्र ती सापडली नाही. सोमवारी तिचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला. किल्लारी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून तपास सहायक पोलिस निरीक्षक मोहन भोसले करीत आहेत.

Web Title: women suicide