सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

सासरच्या मंडळीवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल

नांदेड: सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेनी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथे मंगळवारी (ता. 16) घडली. या प्रकरणी सासरच्या मंडळीवर हिमायतनगर ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथे राहणारी सोनाबाई रामराव वाळके (वय 22) यांना पती रामराव वाळके, सासरा दत्ता बाजीराव वाळके, सासू अनुसयाबाई वाळके हे संगनमत करून त्रास देत असत. माहेराहून पैशाची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करत. वेळप्रसंगी तिला पती मारहाण करून उपाशी ठेवत असे. सतत तिला लहान-मोठ्या कारणांवरून भंडावून सोडत असत. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून सोनाबाई रामराव वाळके यांनी गाव शिवारात जाऊन विष प्राशन केले. यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी नागोराव जयवंत बरडे यांच्या फिर्यादीवरून पती, सासरा व सासूविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन गायकवाड हे करीत आहेत.

Web Title: women suicide in nanded district