वाशीत महिला मेळावा संपन्न; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची उपस्थिती

Womens Meet in Vaashi Dr Pratapsingh Patils presence
Womens Meet in Vaashi Dr Pratapsingh Patils presence

वाशी जि. उस्मानाबाद - महिला सक्षमीकरणासाठी बचतगटाच्या माध्यमातून उद्योगनिर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केले आहे. ते तेरखेडा ता. वाशी येथे रक्षाबंधनानिमित्त आयोजित बचत गटाच्या महिला मेळाव्यात शनिवारी (ता. 1) बोलत होते. या महिला मेळाव्यास जवळपास 267 बचतगटाच्या 2000 पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांनी डॉ. प्रतापसिंह पाटील व इतर मान्यवरांना राख्या बांधल्या.

यावेळी काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बिभीषण खामकर, डी. सी. सी. माजी संचालक काकासाहेब पाटील, शिवसेना विभागप्रमुख श्रीराम घुले, युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब मांगले, भूमचे माजी युवासेना तालुकाप्रमुख महेश चव्हाण, मेळावा मार्गदर्शक संगिता भांडवले, जि. प. सदस्य उध्दव साळवी, पंचायत समिती सदस्य रुपाली घोलप, तेरखेड्याचे उपसरपंच फरिद पठाण, देवळालीचे सरपंच समाधान सातव, चिंचपूरचे उपसरपंच सुधीर ढगे, कडकनाथवाडीच्या सरपंच रविका शिंदे, खामकरवाडीच्या अंजना सावंत, सटवाईवाडी सरपंच शिवगंगा फरताडे, रणजित घुले, मधुकर घोलप, कादरभाई शेख, अॅड. महेश आखाडे, बचतगट प्रमुख दैवशाला कडवकर, शाम गांधले,पांडूरंग घुले, विकी चव्हाण, अक्षय चव्हाण, सचिन सोनारीकर, गणेश नेटके बाबा घुले हे उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, बचतगट निर्माण करणे आणि तो टिकवणे हे खुप जिकीरीचे काम आहे. पण हे काम अनेक बचतगट चांगल्या पध्दतीने करत आहेत. अशा बचतगटाचा सन्मान व त्यांना लागेल ते सहकार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

त्याचप्रमाणे बचतगटामुळे अनेक कुटुंबांची प्रगती झाली. पण फक्त कुटुंबांची प्रगती होऊन चालणार नाही. तर समाजाची प्रगती करण्यासाठी या बचतगटाचा उपयोग होणं गरजेचे आहे. बचतगटातून वैयक्तिक उद्योग निर्मिती करण्यापेक्षा सामुहीक उद्योग निर्माण झाले तर भविष्यात वाशी तालुका नक्कीच महाराष्ट्राच्या नकाशावर आल्याशिवाय राहणार नाही. ज्या बचतगटांना उद्योग करायचे असतील त्यांना बँक कर्जासाठी वाटेल ती मदत मी स्वतः करायला तयार असल्याचे पाटिल यांनी यावेळी सांगितले आहे.
    
यावेळी संगिता भांडवले यांनी घरात बचत कशी करावी व बचतीचा पैसा कसा मार्गी लावावा. त्यातून छोटे उद्योग कसे करावेत याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सभापती बिभीषण खामकर, दशरथ महाराज सावंत यांचीही भाषणे झाली. मेळाव्याचे प्रास्ताविक प्राचार्य सतिश मातने यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक जाधव तर आभार अक्षय चव्हाण यांनी मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com