महिला पोलिसाच्या हाताचा लचका तोडला

प्रल्हाद कांबळे 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

नांदेड : एका हाणामारीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीला इतवारा ठाण्यात आणल्यानंतर त्याने व त्याच्या कुटूंबियांनी प्रचंड गोंधळ घातला. एवढेच नाही तर शिविगाळ करून चक्क एका महिलेच्या हाताचा लचका तोडला. हा प्रकार इतवारा ठाण्यात बुधवारी (ता. 8) दुपारी तीनच्या सुमारास घडला.

इतवारा ठाण्याच्या हद्दीत गायत्रीमंदीर परिसरात राहणारा विष्णुप्रसाद हरिप्रसाद जोशी याच्यावर एका हाणामारीच्या प्रकरणात इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक साहेबराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधचे फौजदार नंदकिशोर सोळंके यांनी विष्णु जोशी याला ठाण्यात आणले. यावेळी ठाणे अमलदार यांच्या कक्षात त्याला बसविले. काही वेळाने अनुसया जोशी आणि वृषभ जोशी हे तिथे आले. उपस्थित महिला पोलिसांना आमच्या माणसाला ठाण्यात का आणले म्हणून अश्लिल शिविगाळ करू लागले. चक्क अर्धातास त्यांनी ठाण्यात गोंधळ घातला.

एवढ्यावरच न थांबता विष्णु जोशी याने महिला पोलिस शिपाई मिरा सावंत यांच्या उजव्या हाताच्या पोटरीला कडाडून चावा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. या तिघांनी शासकिय कामात अडथळा निर्माण करून पोलिस ठाण्यात गोंधळ घालून कर्मचाऱ्यांना शिविगाळ केली. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. मिरा सावंत यांच्या फिर्यादीवरुन इतवारा ठाण्यात विष्णु जोशी, अनुसया जोशी आणि वृषभ जोशी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

Web Title: Women's police hand injured