उमरगा पोलिस ठाण्याचा कारभार महिला कर्मचाऱ्यांच्या हाती, कर्तव्यदक्ष असल्याचे दिले दाखवून

Umarga Latest News
Umarga Latest News

उमरगा (जि.उस्मानाबाद) : पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना नियमित कामकाजापेक्षा कार्यालयीन कामाचा अनुभव यावा, म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सोमवारी (ता.आठ) महिला कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्याचा कार्यभार सांभाळला. महिला दिनानिमित्त विविध उपक्रम साजरे केले जातात. येथील पोलिस निरीक्षण मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिसांनी संपूर्ण ठाण्याचा कारभार आपल्या खांद्यावर घेऊन कर्तव्यदक्ष असल्याचे दाखवून दिले. समाजात या ना त्या कारणाने महिलांना दुर्लक्षित केले जाते.

घर, कार्यालय आदी ठिकाणी त्याचा उचित सन्मान होत नाही. मात्र उमरग्याचे पोलिस निरीक्षकांनी वेगळा पॅटर्न राबवून आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य बजावत असलेल्या महिलांना ही जबाबदारी देऊन त्याचा उचित सन्मान केला आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याची संधी स्कुल डे निमित्ताने मिळत असते. वर्षभर कितीही खोड्या करणाऱ्या विद्यार्थ्याला एक दिवशीय शिक्षकांची जबाबदारी आल्याने त्याचे महत्त्व कळते.

त्याच धरतीवर पोलिस ठाण्यातील महिलांना ही संधी देण्यात आली होती. पोलिस निरीक्षक यांच्या खुर्चीवर हेडकॉन्स्टेबल सुनीता राठोड यांना जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली बबिता शिंदे, बबिता चव्हाण, सारिका कदम, सोनी काळे, ज्योती घुगे या महिला कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्याचा कारभार सांभाळला.

संपादन - गणेश पिटेकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com