लाकडी उडता घोडा वाढवतो रोगप्रतिकारक शक्ती!

ghogri.jpg
ghogri.jpg

घोगरी, (ता. हदगाव, जि. नांदेड) ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करण्यात येत असल्याने बहुंताश नागरीक घरीच राहणे पसंत करीत आहेत. शरीर निरोगी ठेवण्यासाठी, काही ज्येष्ठ नागरिक आजही  सकाळच्या प्रहरी ‘लाकडी उडता घोडा’ वरून चालण्याचा छंद जोपासत असल्याचे चित्र आहे. या मुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून आनंदी राहण्यास मदत मिळणार आहे. 

रोगराईचे प्रमाण वाढले 

शरीर धडधाकट राहावे यासाठी गावातील प्रत्येक नवतरुण व्यायाम करण्यात मग्न असतात. शिवाय प्रत्येक खेड्यात कुस्त्याचे फड घेण्याची प्रताप प्रचलित असल्याने, गावातील चांगल्या खेळाडूला गावकऱ्यांच्या वतीने प्रोस्ताहन दिले जात असे. या मुळे प्रत्येक गावातून गुणवंत खेळाडू तयार होत असत.

शरीर सुदृढ राहिल्यास रोग प्रतिकार शक्ती कमी होऊन रोगराईचे प्रमाण सुद्धा कमी होण्यास मदत मिळते, म्हणून ग्रामस्थ जास्तीत-जास्त खेळाच्या स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्नशील असत. नजीकच्या काळात कबड्डी, कुस्ती या अंग मेहनतीच्या खेळाकडे तरुणांनी पाठ फिरवली असल्याने, या खेळाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. या मुळे सहाजिकच, सकाळच्या प्रहरी, तलावात पोहणे, उंच टेकडीवर धावत जाणे, चालत जाणे, दंड बैठका, सूर्यनमस्कार, ही व्यायामाचे प्रकार जवळपास लोप पावल्याने रोगराईचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या महिन्यापासून संपूर्ण देशभर ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्य लॉक डाऊन होण्याने व सर्वत्र संचार बंदी लागू असल्याने, वयोवृद्ध नागरिकही घरातच बसून राहावे लागत असल्याने, उतार वयात आजाराची समस्या भेडसावू नये म्हणून सकाळच्या प्रहरी ‘लाकडी घोडे करून’ त्याने दूरवर चालतांना दिसत आहेत.

या प्रकाराने संपूर्ण शरीराची हालचाल होत असल्याने, सूर्यनमस्कार, दंड बैठका, या प्रकारापेक्षाही हा प्रकार सोपा व शरीरास लाभदायक असल्याचे  कोणत्याही वयाच्या व्यक्तीने हा प्रकार नित्यनेमाने केल्यास या व्यायामाने रोगप्रतिकारशक्‍ती वाढते असे त्यांचे म्हणणे आहे. या मुळे भागातील बरेच वृद्ध त्यांचा हा जुना छंद जोपासत आहेत.

सकाळीच उठून कुणी शेताकडे फेरफटका मारीत आहे, तर कुणी भोकर तामसा रोडवर चालताना आढळून येत आहे. हा अनोखा खेळ पाहण्यासाठी नऊ तरुणाची एकच झुंबड उठत असून, त्यांनी ‘लाकडी उडता घोडा’ कला अवगत करून घेण्याची धडपड चालवलेली पहावयास मिळत आहे. परंतु वृद्ध नागरिकांच्या वतीने या खेळापासून आनंद व उत्साह वाढत असून, खरंच जुनं ते सोनं असं म्हणणे वावगं ठरणार नाही. असे त्यांचे मत आहे. 

ही कला खूपच जोखमीची असून, ही अवगत करण्यासाठी किमान एक महिना तरी लागतो, संपूर्ण शरीराचे हलचाल या प्रकारामुळे होत असल्याने, घरीच बसून राहणाऱ्यांना, ही पद्धत लाभदायक ठरणार आहे. इतर व्यायामापेक्षा वृद्ध व्यक्तीसाठी हा सोपा व्यायामाचा प्रकार असून, चालणे व धावण्यापेक्षा, उडत्या घोड्याचा, सर्वांनी सराव करण्याचे प्रयत्न केल्यास थकवा कमी होण्यास मदत मिळणार आहे.
- लक्ष्मण गुलेवाड, घोगरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com