चितेगाव येथील खदानमध्ये आढळला कामगाराचा मृतदेह

चित्र
चित्र

चितेगाव  (जि.औरंगाबाद) : चितेगाव (ता. पैठण) येथील खदान व खडी केंद्रावर रात्री रखवालदार म्हणून काम करणाऱ्या कामगाराचा मृतदेह बुधवारी (ता. 21) सकाळी आढळून आला.

चितेगाव येथे मोठ्या प्रमाणात दगड खदान व खडी केंद्र असून मोठ्या प्रमाणात येथे कामगार काम करतात. यात अनेक जण रात्री रखवालदार म्हणून काम करतात. येथील एका खदान, खडी केंद्रावर रात्री रखवालदार म्हणून रावसाहेब नानासाहेब ढंगे (वय 65, रा. पैठणखेडा, ता. पैठण) हे काम करत होते. मंगळवारी (ता.20) रात्री रावसाहेब ढंगे नेहमीप्रमाणे कामावर गेले असता बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह खडी केंद्राच्या बाजूला असलेल्या खदानमध्ये आढळून आला.

ही घटना मंगळवारी रात्री घडली असल्याचा अंदाज असून बुधवारी सकाळी निदर्शनास आली. सकाळी अकरापर्यंत सदरील मृतदेह खदानमध्ये पडून होता. खडी केंद्र मालकाने कुठली ही सहानुभूती दाखविली नाही किंवा येऊन विचारपूस केली नसल्याचे मृताच्या नातेवाइकाने सांगितले. घटनेबाबत मृताच्या नातेवाइकाने बिडकिन पोलिस ठाण्यात माहिती दिली. बिडकिन पोलिसांनी सकाळी अकराला पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील बिडकीन ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाचा तपास बिडकीन पोलिस ठाण्याचे जमादार बाळासाहेब लोणे करीत आहेत.

कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर
चितेगाव येथे औरंगाबाद-पैठण रस्त्याला लागूनच मोठ्या प्रमाणात दगडाच्या खाणी व खडी केंद्र आहेत. येथे अनेक असंघटित कामगार काम करतात. काम जोखमीचे असून कामगारांच्या सुरक्षेसाठी कुठल्याही सुविधा नाही. येथे काम करत असताना अनेक कामगारांना जीव गमवावा लागला, तर काहींना जखमी होऊन अपंगत्व आले आहे. तुटपुंजी मदत कत्रून खदान मालक नामानिराळे होतात. त्यामुळे कामगारांचे भविष्य धोक्‍यात येते. परिवाराचा कमवता आधार संपल्याने या कामगारांचा परिवार उघड्यावर येतो. याकडे शासनाने गांभीऱ्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com