मनपा शाळेवरून पडून रंग कामगाराचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

औरंगाबाद, ता. 9 : रंग देताना तोल सुटल्याने शाळेच्या गच्चीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. नऊ) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. 

औरंगाबाद, ता. 9 : रंग देताना तोल सुटल्याने शाळेच्या गच्चीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. नऊ) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. 

प्रकाश मारोती हिवाळे (वय 60) असे मृत रंग कामगाराचे नाव आहे. हिवाळे हे एसएफएस शाळेजवळील एका खोलीत राहत होते. कैलासनगर येथील महापालिकेच्या शाळेचे रंगकाम सुरू आहे. सकाळीच ते रंग देण्यासाठी शाळेवर आले. सकाळी साडेनऊच्या दरम्यान गच्चीवर असताना त्यांचा तोल सुटला व ते खाली कोसळले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तत्काळ घाटीत दाखल केले. तात्पुरते उपचार करून त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आले; परंतुु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची जिन्सी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: workers died falling from the school

टॅग्स