कामगारांच्या मागण्यांसाठी 14 ला राज्यभरात धरणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा. तसेच पक्षपाती निर्णय, नियमबाह्य निर्णय रद्द करावेत, यासाठी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेतर्फे 14 ऑक्‍टोबरला राज्यभरात विभागीय स्तरावर धरणे आंदोलने करण्यात येणार आहेत, अशी माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

संघटनेच्या मागण्यांमध्ये राज्य परिवहन कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतननिश्‍चिती करावी. कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी. वेतनवाढीच्या अधीन राहून 25 टक्‍के अंतरिम वाढ एक एप्रिल 2016 पासून लागू करावी. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 15 हजार देण्यात यावेत. लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरू कराव्यात. परिपत्रक 24 मध्ये असलेल्या जाचक अटी काढून टाकाव्यात. चालकाला विनावाहक काम करण्याची सक्‍ती करू नये. निरनिराळ्या बाबींचे कंत्राटीकरण करण्याची पद्धत रद्द करावी. मंजुरीप्रमाणे सर्व पदांवरील कामगारांच्या नेमणुका कराव्यात, सेवानिवृत्त कर्मचारी व त्याच्या पत्नीस वार्षिक पाचशे रुपये भरून मोफत पास देण्यात यावा अशा मागण्या करण्यात येणार आहेत. पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष सदाशिव शिवणकर, राजेंद्र मोटे उपस्थित होते. 
 
कोट्यवधींचे होतेय नुकसान 
एसटीने लांब पल्ल्याच्या जवळपास 600 ते 650 फेऱ्या बंद केल्या आहेत. तसेच विनावाहक एसटी धावत असल्याने महामंडळाला रोज वीस कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे खासगी प्रवासी वाहतूक बोकाळली आहे. 
 
हजार कोटींची हवी तरतूद 
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची विशेष तरतूद करावी. नुकतीच अशी पाचशे कोटींची तरतूद गुजरातने केली आहे. नफा-तोट्याचा विचार न करता, एसटीला सेवा उद्योग जाहीर करावा.

Web Title: workers to the state demands on 14oct2016