औरंगाबाद येथे जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन

अनिल जमधडे / योगेश पायघन
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

  • दलाई लामा यांची प्रमुख उपस्थिती
  • पंधरा देशांतून आलेल्या विविध भिक्खू संघ
  • समता सैनिक दलाकडून सलामी 

 

औरंगाबाद - पीईएसच्या क्रीडांगणावर तीनदिवसीय जागतिक बौद्ध धम्म परिषदेला आज (शुक्रवारी) सायंकाळी साडेपाच वाजता सुरवात झाली. 

अखिल भारतीय भिक्‍खू संघाचे संघानुशासक भदन्त सदानंद महास्थवीर, श्रीलंकेचे भदन्त महानायक महाथेरो डॉ. वरकगोडा धम्मासिद्धी, भदन्त बोधिपालो महाथेरो, सारनाथचे भदन्त चंदिमा, नेपाळचे भदन्त मैत्री
महाथेरो, लडाखचे भदन्त संघदेसना, श्रीलंका भदन्त शिवली, साऊथ कोरिया भदन्त वॉनसन, भदन्त प्रधामबोधिवॉंग, थायलंडचे भदन्त प्रहमा केयरती श्रीउथाना, कम्बोडिया भदन्त पीच सेम यांची प्रमुख उपस्थिती जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन झाले.

सुरवातीला जागतिक बौद्ध धम्म परिषदेवर रोजाना व्हेनीच कांबळे यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. दरम्यान, सामूहिक वंदनेत अखिल भारतीय भिक्खू संघाचे स्वागत करण्यात आले. भिक्खू संघाने सामूहिक वंदना करत परिषदेचे उद्घाटन पार पडले. यावेळी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी 15 देशांतून
आलेल्या विविध भिक्खू संघाला समता सैनिक दलाकडून सलामी देण्यात आली. त्यानंतर त्रिशरण पंचशील सामूहिक याचना झाली. यावेळी डॉ हर्षदीप कांबळे, डॉ. अरविंद गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

Image may contain: 1 person, crowd and outdoor

बोधिपालो महाथेरो यांनी प्रास्ताविकात पैठण, भोकरदन, वाशीम, नांदेड, अजिंठा, नालासोपारा आदी भागांसह मिलिंद आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक संदर्भांची माहिती देत त्यामुळे ही परिषद या ठिकाणी घेण्यात आल्याचे सांगितले. रोजाना व्हेनीच कांबळे, डॉ. हर्षदीप कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.  भगवान बुद्धांची शिक्षा, धम्म आचरण
करतात, जे लोक समाधीचा अभ्यास करतात स्वतः चिंतन करून क्लेश विचार काढून टाकतात. मनुष्यात सन्मान मानवता आणि मित्रत्व निर्माण करून लौकिक सुख प्राप्ती केल्या जाऊ शकते. त्यामुळे स्वतःही आणि दुसऱ्यालाही सुखी करतात. त्यामुळे जगाला तो कल्याणकारी मार्ग असून त्यासाठी जगभरातील भिक्खू या एतिहासिक भूमीत आल्याचे बोधिपालो महाथेरो यांनी सांगितले. 

परिषदेला झाली सुरवात
श्रीलंकेचे भदन्त महानायक महाथेरो डॉ. वरकगोडा धम्मासिद्धी यांनी परिषदेचे सुरवात झाल्याचे साडेसहा वाजता जाहीर केले. डॉ. तेंग झिंग ताय हे दलाई लामा यांचे प्रतिनिधी यांनी बुद्ध धर्म श्रेष्ठ असल्याचे सांगून जीवधारी प्राणी सुखी व्हावे. मी आणि परका ही भावना नष्ट होवो सर्व विचारधारा एक हो अशी मंगल कामना केली. पुढे बोलताना ते म्हणाले, दलाई लामा
यांच्यासह आपण सर्व बुद्ध धम्म मानत असून बुद्धाचा प्रेम करुनेचा संदेश सर्व पाळूया. मैत्री भाव कायम ठेवूया. प्रत्येकाचा अभ्यास कोणताही असो. पण, सर्वांप्रती मैत्री स्थापन होण्याची गरज आहे. भारतीय प्राचीनचिकित्सा, विद्या मनोविज्ञानाचा प्रसार गरजेचा असून, जगाला त्याचा लाभ मिळावा. सर्व जगात सोबत राहणे गरजेचे असताना पर्यावरणाची प्रत्येकाने काळजी
घेणेही गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या -

चित्रांतून दलाई लामा यांचे असे केले स्वागत : Video

 

धम्मगुरु दलाई लामा यांचे औरंगाबादेत आगमन ​

 नागसेनवनात आज उसळणार धम्मसागर

स्वयंसेवकांचा शिस्तीचे दर्शन नम्रपणाने भारवले उपासक
पीईएसच्या क्रीडांगणावर तीनदिवसीय जागतिक बौद्ध धम्म परिषदेत आज सायंकाळी स्वयंसेवकांच्या शिस्तीचे दर्शन झाले. जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने देश देशातून आलेल्या उपासक याना मार्गदर्शन करण्यासाठी शेकडो स्वयंसेवक सज्ज झाले होते. उपासकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नम्रपणे स्वयंसेवक पुढे सरसावत होते. मैदानावर ट्रेड फेयर
लावण्यात आले होते. ट्रेड फेअरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, इलेक्ट्रिकल बाईक, ऑटोमोबाईल उत्पादने, खाद्यपदार्थ, विविध लघुउद्योजकांची विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.

ट्रेडफेअरसाठी भव्य पेंडॉल टाकण्यात आलेला होता. प्रवेशद्वारावरच तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती लक्ष वेधून घेत होत्या. विविध उपासकांनी मूर्तीसमोर उभे राहून सेल्फी घेतल्या, तर अनेक उपासकांनी नतमस्तक होत जोडले. धम्म परिषदेसाठी येणाऱ्या उपासकांच्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली
होती. अस्तव्यस्त वाहने लागणार नाही, यासाठी स्वयंसेवकनम्रपणे वाहनधारकांना सांगून प्रयत्न करत होते.  धम्मपरिषदेसाठी चारही बाजूचे रस्ते उपासकांच्या गर्दीने फुलून गेले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Buddhist Meet's Inaugaration At Aurangabad