चिंताजनक : हिंगोलीत पुन्हा सोमवारी तब्बल २२ रुग्ण पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

राजेश दारव्हेकर
Tuesday, 21 July 2020

सारी रुग्णाचा मृत्यू नंतर अहवाल पॉझिटिव्ह ,तर दहा रुग्णांची प्रकृती गंभीर.

हिंगोली : जिल्ह्यात सोमवारी (ता. २०) रात्री  साडेदहा वाजता  प्राप्त अहवालानुसार एकाच दिवशी नव्याने २२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली     असून, काल सारीच्या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दहा रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.

यामध्ये तालाब कट्टा कन्टेन्टमेन्ट झोनमधील कोविड अँटीजन टेस्ट तपासणीमध्ये पाच कोरोना रुग्णाचा समावेश आहे. कळमनुरी भाजी मंडई येथील ८०,४२, २०, १७ वर्षीय स्त्री तर ४५, २२ वर्षाच्या पुरुषाचा समावेश असून कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. वसमत अशोकनगर येथील २० वर्षीय पुरुष व सहा वर्षाचा मुलाचा समावेश आहे, तर वसमत येथील शुक्रवार पेट येथील ३६ वर्षीय स्त्री, हिंगोली आझम कॉलनी २८ वर्षीय पुरुष, तसेच हिंगोली येथील विठ्ठलनगर, श्रीनगर येथील एका ६० वर्षीय पुरुष, कासारवाडा येथील २५ वर्षीय पुरुष याशिवाय आरोग्य विभागातील ४०, ३२, ४०,   ४२, ३२ वर्षीय अशा पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तालाब कट्टा येथील ५८ वर्षीय स्त्री ४५, ५८, वर्षीय स्त्री, तर ५०, १८ वर्षाच्या पुरुषाचा    समावेश असून जवळच्या रुग्णांशी संपर्क आला आहे. तालाब कट्टा येथील चार ही जण कन्टेन्टमेन्ट झोन कोविड अँटीजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह निघाले आहेत. 

कळमनुरी तालुक्यातील 

कळमकोंडा येथील येथील एकाचा आयसोलेशन वॉर्डात उपचारा दरम्यान सारीच्या आजाराने ता. १८ जुलै रोजी मृत्यू झाला होता. परंतू त्याचा मृत्यूनंतर पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.
दरम्यान, वसमत अंतर्गत कोरोना केअर सेंटर येथे नऊ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये शुक्रवार पेठ सात, वापटी एक, सोमवार पेठ एक असे नऊ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यन्त  ४३३ रुग्ण झाले असून, त्यापैकी ३१९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण ११३ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यातील एका जणाचा मृत्यू झाला आहे.तर औंढा येथे अंजनवाडी येथील एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचानांदेड कोरोना ब्रेकिंग : सोमवारी ५१ बाधितांची भर, तर तिघांचा मृत्यू

जिल्हा सामान्य रुग्णालय 

आयसोलेशन वॉर्ड अंतर्गत ३२ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. यामध्ये. रिसाला एक,  जीएमसी एक, धूत हॉस्पिटल एक, ब्राह्मण गल्ली वसमत एक,पेडगाव एक, शुक्रवार पेठ नऊ, नव्हलगव्हाण एक, तालाब कट्टा दोन,  गवळीपुरा एक, पेन्शनपुरा एक, अंजनवाडी एक, सेनगाव तीन, जयपूरवाडी एक,नवा मोंढा हिंगोली एक, कासारवाडा दोन, आझम कॉलनी दोन ,पलटण एक, नारायणनगर एक, अशोक नगर एक, श्रीनगर एक यांचा समावेश आहे. 

वसमत येथील डेडीकेटेट कोअर सेंटर येथे १५ रुग्ण भरती 

तर वसमत येथील डेडीकेटेट कोअर सेंटर येथे १५ रुग्ण भरती असून यात स्टेशन रोड तीन, सोमवार पेठ एक, सम्राटनगर पाच,  गणेशपेठ एक, पारडी एक, गुलशननगर एक, बहिर्जीनगर एक ,स्वानंद कॉलनी एक, अशोक नगर दोन यांचा समावेश आहे.
तसेच कळमनुरी येथे कोरोना सेंटर मध्ये  एकूण १६ रुग्णावर उपचार सुरु असून, नवी चिखली तीन, नांदापूर एक, आखाडा बाळापूर तीन नांदेड संदर्भीत, कांडली दोन, रेडगाव एक, भाजी मंडई सहा यांचा समावेश आहे. याशिवाय लिंबाळा अंतर्गत कोरोना सेंटर येथे ३४ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये  पेडगाव चौदा, रामादेऊळगाव पाच, पहेनी दोन, माळधामणी एक, तालाब कट्टा पाच, खडकपुरा सात यांचा समावेश आहे. सेनगाव येथे बसस्टँड येथील एक, बालाजीनगर तीन, समतानगर पाच, जणांचा समावेश असून रुग्णावर उपचार सुरु आहेत.

क्वारंटाइन सेंटर अंतर्गत ६४३८ व्यक्तींना भरती करण्यात आले होते

जिल्ह्यात गावपातळीवर तसेच क्वारंटाइन सेंटर अंतर्गत ६४३८ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ५७९६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ५५१६ व्यक्तींना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला ८८१ रुग्ण भरती असून, २६६ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णापैकी दहा रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worrying: As many as 22 patients tested positive in Hingoli on the same day hingoli news