अवघ्या वीस मिनिटांत दागिने लंपास

परंडा ः चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकलेले साहित्य.
परंडा ः चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकलेले साहित्य.

परंडा (जि.उस्मानाबाद) ः शहराच्या मध्यवस्तीतील घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले. रविवारी (ता.18) पहाटेच्या सुमारास अवघ्या 20 मिनिटांत कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने लंपास केले. दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

 
टेलरिंग व्यावसायिक हारुण बशीर बागवान यांचे घर जिल्हा बॅंकेच्या शाखेसमोरील बागवान गल्लीत आहे. हारुण बागवान हे पत्नीसह हज यात्रेसाठी गेले आहेत. त्यांची दोन विवाहित मुले कुटुंबासह घरात झोपलेले असताना रविवारी पहाटे पावणेएकच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करीत ऐवज पळवला. जिल्हा बॅंकेसमोरील रस्त्यावरून बागवान गल्लीत असलेल्या घरासमोरील भिंतीवरून दोन चोरट्यांनी आत प्रवेश केला. हॉलच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील एक तोळ्याचे गळसर, एक तोळ्याचे गंठण, अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र व अर्धा तोळ्याचे कर्णफुले असा लाखोंचा ऐवज लंपास केला. आज सकाळी चोरी उघडकीस आली असून, सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी पाहणी करीत तपास सुरू केला. 


चोरट्यांनी शेजारच्या दोन घरांच्या दरवाजाच्या कड्या लावून आत प्रवेश केला. वसीम बागवान यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा परंडा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस नाईक के. आर. हावळे तपास करीत आहेत. शहरात चोरीच्या घटनांत वाढ झाल्याने पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com