पुण्याच्या काकासाहेब पवार तालीम संघातील प्रशिक्षकांना धक्काबुक्की

महेश गायकवाड
शनिवार, 22 डिसेंबर 2018

जालना : जालना येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला चौथ्या दिवशी गालबोट लगले. महाराष्ट्र केसरी गादी विभागात उपांत्य पूर्व फेरीच्या लढतीत अभिजित कटके विरुद्ध गणेश जगताप यांच्यातील लढत शेवटी वादग्रस्त ठरली.

स्पर्धेच्या शेवटच्या मिनिटाला गणेश जगताप हल्ला करत असताना पंचानी शिट्टी वाजवत लढत थांबवली. यावर जगतापच्या प्रशिक्षकांनी आक्षेप घेत आव्हान दिले. मात्र, ते स्विकारेपर्यंत लढत पुन्हा सुरु झाली आणि अभिजीत कटकेने गणेश जगतापला चितपट केले. यात अभिजित कटके 7-0 गुणांनी विजयी झाला.

दरम्यान पंचाच्या निर्णयावर अक्षेप घेत आखाड्यात धाव घेतली. त्यामुळे संयोजक व प्रशिक्षका वाद झाला. गणेश जगतापवर अन्याय झाला अशी ओरड करत पुण्याच्या काकासाहेब पवार तालमीतील प्रशिक्षक व मल्लांनी आखाड्यात ठिय्या मांडला त्यामुळे पहिल्या सत्रातील उर्वरित सामने रद्द करण्यात आले.  

हा प्रकार योग्य नसल्याचे सांगत गोंधळ घालणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच उर्वरित सामने वाद मिटवून सायंकाळी खेळवले जातील अशी प्रतिक्रीया स्पर्धेचे आयोजक राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सकाळशी बोलताना दिली.

Web Title: wrestling coaches manhandled in Maharashtra Kesari Competition