उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द, बीडला अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपशब्द लिहिणाऱ्या बीड पंचायत समितीमधील विस्तार अधिकाऱ्यास चांगलेच महागात पडले आहे. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याच्या अंगावर शाई फेकून तोंडाला काळे फासले.

बीड - शिवसेनेच्या फेसबुक पेजवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चुकीच्या शब्दांत टिपण्णी केल्याचा आरोप करत एका अधिकाऱ्याच्या अंगावर कार्यकर्त्यांनी शाई फेकल्याची घटना सोमवारी (ता. 30) येथील पंचायत समिती कार्यालयात घडली. 

बीड पंचायत समितीतील विस्तार अधिकारीपदावर असलेल्या एका अधिकाऱ्याने फेसबुकवर वादग्रस्त टिपण्णी केली होती.

हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक...

त्यामुळे संतप्त शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात जाऊन या अधिकाऱ्याच्या अंगावर शाई फेकत त्याच्या तोंडालाही काळे फासण्याचा प्रयत्न केला. 

हेही वाचा - आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती

या अधिकाऱ्याचा कार्यालयातच पानउतारा करत माफीदेखील मागायला लावली. यानंतर कार्यालयाच्या आवारात मोठी गर्दी जमली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wrong Words About Uddhav Thackeray, Ink Was Thrown At The Officials of The Beed