आवड आणि संधी यांची सांगड घालून करिअर निवडा

लातूर - सकाळ आणि संजय घोडावत विद्यापीठ (कोल्हापूर) यांच्या वतीने ‘यशाची गुरुकिल्ली: उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत डॉ. अमेय काटदरे यांनी शनिवारी संवाद साधला. यावेळी प्रा. अर्जुन पाटील, प्रा. श्रीशैल सलगरे उपस्थित होते.
लातूर - सकाळ आणि संजय घोडावत विद्यापीठ (कोल्हापूर) यांच्या वतीने ‘यशाची गुरुकिल्ली: उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत डॉ. अमेय काटदरे यांनी शनिवारी संवाद साधला. यावेळी प्रा. अर्जुन पाटील, प्रा. श्रीशैल सलगरे उपस्थित होते.

लातूर - सचिन तेंडुलकर इंजिनिअर झाला असता किंवा लता मंगेशकर डॉक्‍टर झाल्या असत्या तर..? एक चांगला खेळाडू किंवा चांगली गायिका भारताला मिळाली नसती. त्यामुळे आवड आणि संधी यांची सांगड घालून तुम्हीही तुमचे करिअर निवडा; पण त्यात यश मिळवायचे असेल तर धडपड, कष्ट याला पर्याय नाही, असा सल्ला करिअर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना दिला. 

सकाळ आणि संजय घोडावत विद्यापीठ (कोल्हापूर) यांच्या वतीने ‘यशाची गुरुकिल्ली: उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत डॉ. अमेय काटदरे, प्रा. अर्जुन पाटील, प्रा. श्रीशैल सलगरे यांनी शनिवारी मार्गदर्शन केले. यावेळी शेकडो पालक-विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी उत्सुकतेने विविध प्रश्न विचारत शंकांचे निरसनही करून घेतले. 

डॉ. काटदरे म्हणाले, वेगवेगळे शिक्षण घेऊन त्या माध्यमातून देशाचे नाव उज्ज्वल करू शकतो. आजवर सी. एन. आर. राव, विजय भटकर, सचिन बन्सल अशी कितीतरी नावे आपल्याला सांगता येतील, ज्यांनी देशाला पुढे नेले. तसे आपणही व्हावे, असे अनेकांना वाटते. पैसा, प्रसिद्धी मिळावी, असेही वाटते; पण त्यासाठी धडपड महत्त्वाची आहे. रोबोटिक्‍स, सोलर एनर्जी, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, इंडियन आर्मी, कृषी असे अनेक पर्याय समोर आहेत. फक्त आपल्यात कुठली कला आहे, हे ओळखून करिअर निवडायला हवे. मात्र, कष्टाशिवाय पर्याय नाही हेही लक्षात ठेवायला हवे. 

प्रा. पाटील म्हणाले, शैक्षणिकदृष्ट्या १६ आणि १८ हे वय फार महत्त्वाचे आहे. या वयात घेतलेल्या निर्णयावरून करिअरची पुढची दिशा ठरत असते. त्यामुळे योग्य ते निर्णय घ्या. इंग्रजी भाषेचा न्यूनगंड बाळगू नका. मराठी इतकीच इंग्रजी पक्की असावी. त्यासाठी न भिता इंग्रजी बोला, इंग्रजी वाचा. कुठल्याही क्षेत्रात करिअर करताना ही भाषा गरजेची आहे. या भाषेबरोबरच परदेशी भाषासुद्धा शिका. त्यातही करिअर करता येते. शिक्षण घेऊन चांगल्या मार्गाने पैसा कमविणे वाईट नाही. प्रा. सलगरे यांनी विज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधी सांगितल्या. मिलिंद सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com