स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहाला फिल्टरची भेट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

उस्मानाबाद - "थर्टी फर्स्ट' साजरा करण्याच्या प्रथेला फाटा देत, बचत झालेल्या पैशातून शहरातील "यिन'च्या सदस्यांनी विकलांग मुलींच्या शाळेला "आर-ओ वॉटर फिल्टर' भेट दिला आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त यिनच्या सदस्यांनी "स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहात' मंगळवारी (ता. तीन) हा उपक्रम राबविला. 

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आनंद देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण (पापा) वीर, सरपंच महानंदाताई चौगुले, प्रा. आनंद वीर, अनिल (दादा) वीर, आनंद खोबरे, रंगनाथ कुदळे, संस्थेचे अध्यक्ष शहाजी चव्हाण, संतोष चौगुले, तेरणा कॉलजमधील यिनचे अध्यक्ष सूरज नाईकनवरे आदी उपस्थित होते. 

"थर्टी फर्स्ट' साजरा करण्याची पाश्‍चात प्रथा रूढ होत आहे; परंतु यिनच्या सदस्यांनी या प्रथेला फाटा दिला आहे. अनाठायी पैसे खर्च करण्याऐवजी बचत केलेल्या पैशातून आळणी (ता. उस्मानाबाद) येथील "स्वाआधार' मतिमंद मुलींच्या शाळेला पिण्याच्या पाण्याचा 12 हजार रुपयांचा "आर-ओ फिल्टर भेट दिला आहे. या वेळी यिनचे सदस्य अश्‍विनी मालखरे, ऋतुजा जगताप, पूनम मंगरूळे, प्रगती सस्ते, नागेश निरमळे, करण माळकर, मेहराज शेख, शुभम म्हेत्रे, शुभव क्षीरसागर, ऋषिकेश पाटील, सूर्याजी धुमाळ, संदीप शिंदे, वैभव गुंड, संदीप सूर्यवंशी, धैर्यशील पडवळ, अमर मगर, हर्षद थोरात, शुभम गाडे, बाळू केदार, सुजित जमदाडे, योगेश निंबाळकर, तसेच अक्षय माळी, अनिकेत घोळकर, सारंग जोशी, उदय निरमळे, गौरव टाळके, सूरज पवार, घनश्‍याम गरड, सागर घुगे, वैभव पाटील, आकाश लांडगे, नितेश पडवळ आदी उपस्थित होते. शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आर्थिक साहाय्य केले.

Web Title: YIN member givern Water filter gift