‘यिन समर यूथ समिट’ची तरुणाईला उत्सुकता

YIN Summer Youth Summit
YIN Summer Youth Summit

औरंगाबाद - विधायक कार्य करण्यासाठी युवकांना प्रेरित केले जाते तेव्हा त्यांच्यामध्ये जग बदलण्यासाठी ताकद आणि गतिशीलता निर्माण होते. याकरिताच ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे (यिन) महाविद्यालयीन तरुणाईसाठी ‘यिन समर यूथ समिट’ होणार आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी औरंगाबादेत सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात १० ते १२ जूनला ही समिट घडणार असून, यासाठी तरुणाईची उत्सुकता ताणली आहे.

युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्‍तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. शिबिरात दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधींचा वेध ‘यिन’च्या व्यासपीठाद्वारे घेता येणार आहे. राज्यभर होणाऱ्या परिषदांसाठी स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी मुख्य प्रायोजक आहे. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असेल; तर कॅड सेंटर इन असोसिएशन असेल.

परिषदेत सहभागी होणाऱ्या ‘यिन’च्या सदस्यांना निवास व भोजन व्यवस्थेसाठी प्रत्येकी रुपये १९९, तर सदस्येतरांसाठी रुपये ३९९ शुल्क आकारण्यात आले आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना परिषद किट आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून ‘यिन’ या पद्धतीच्या शिबिरांचे आयोजन करीत आहे.

आजच्या युवकांची स्वप्ने प्रत्यक्षात साकारण्यासाठी ‘यिन’च्या यूथ समिटमध्ये युवकांना संधी मिळणार आहे, याचा विशेष आनंद होत आहे. ॲनिमेशन आणि व्हीएफएक्‍सच्या माध्यमातून करिअरच्या अनेक संधी युवकांना मिळणार आहेत. जूनमध्ये होणारे समिट तरुणाईसाठी एक आदर्श ठरणार आहे. युवकांनी यात सहभागी व्हावे.
- संजय बोडके, संचालक, मॅक ॲनिमेशन, औरंगाबाद.

उद्याचा युवक या संकल्पनेकडे घेऊन जाणारे व युवकांना उद्योजकतेची दिशा देणारे व्यासपीठ म्हणजे समर यूथ समिट. भावी उद्योजकांची सक्षम पिढी घडवण्यास या समिटचा निश्‍चित उपयोग होईल.
- आकाश सोळुंके,  संचालक, विद्यालंकार क्‍लासेस, औरंगाबाद. 

अधिक माहितीसाठी संपर्क -
ऐश्‍वर्या शिंदे - ७०२८०२६४७७
आकाश गायकवाड - ९९२२८५००४४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com