तुम्ही गर्भवती आहात का? 

माधव इतबारे
शनिवार, 22 डिसेंबर 2018

औरंगाबाद : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक विभागातर्फे महापालिकेला पत्र देण्यात आले असून, त्यात वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची तब्बल 32 मुद्यांवर माहिती मागविण्यात आली आहे. त्यात महिला कर्मचाऱ्यांना गर्भवती असल्याची नोंद देखील करावी लागणार असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. डिसेंबरअखेर ही माहिती सादर करण्याची मुदत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आगामी लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता 2019 च्या सुरवातीला लागण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका होतील, असेही अंदाज बांधले जात असल्याने निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. प्रत्येक निवडणुकाला महापालिकेचे पाचशे ते सातशे कर्मचारी निवडणुक कमासाठी घेतले जातात. त्यानुसार निवडणूक विभागाने महापालिकेला कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नगर सचिव विभाग वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांकडून अर्ज भरून घेत आहे. या अर्जात महिला कर्मचारी गर्भवती आहे का? याची देखील नोंद करावी लागणार असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दोन दिवसाच्या आत कर्मचाऱ्यांनी माहिती सादर करावी अन्यथा कर्मचाऱ्याविरुद्ध भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1949 चे कलम 29 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, अशी तंबी नगर सचिव दिलीप सूर्यवंशी यांनी दिली आहे. 

32 मुद्यांवर मागितली माहिती 
निवडणूक विभागाने तब्बल 32 मुद्यांवर ही माहिती मागितली आहे. त्यात जन्म तारखेसह नोकरीला लागल्याची तारीख, मतदान ओळखपत्र क्रमांक, आधार क्रमांक, ई-मेल आयडी, दीर्घ आजार असल्यास त्याची नोंद करावी लागणार आहे. 

Web Title: You are a pregnant asked by election commission