नांदेड - खंजिराने भोसकून एकाचा खून  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

नांदेड : तरुणाच्या पोटात खंजिर खुपसून त्याचा खून केल्याची घटना सोमवारी (ता. 4) रात्री 9.30 वाजताच्या सुमारास हमालपूरा परिसरात घडली. तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.

हमालपूरा येथील संदिप गंगाधर जाधव (वय 30) हा विवाहित असून कुटुंबासह पुण्यात रहात होता. दरम्यान सोमवारी (ता. 4) संदिप हा दुपारी चार वाजताच्या सुमारास पुण्याहून नांदेडला आला होता. रात्री 9.30 वाजताच्या सुमारास तो विष्णुनगर येथील लहुजी साळवे कमानीच्या अंतर्गत मार्गावरून येत असताना काही तरुणांनी त्याच्यासोबत वाद घालून पोटात खंजिर खुपसला. त्यास गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के, शिवाजीनगर ठाण्याचे पो.नि. साहेबराव नरवाडे, एपीआय करीम खॉन पठाण यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तरुणाचा मृत्यू झाल्याची वार्ता कानी येताच तणावाचे वातावरण पसरले होते. मारेकऱ्याची धरपकड सूरू असून परिसरात पोलिस तळ ठोकून आहेत.

Web Title: a young boy murder with knife in nanded