नैराश्यातून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

लातूर :  लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील माळुंब्रा गावच्या युवा शेतकऱ्याने  शेतीचा पीकविमा भरण्यासाठी पैसे नसल्याने  नैराश्यातून आत्महत्या केली.  माळुब्रा येथे ही धक्कादायक घटना घडली. सचिन मोहन पवार असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱयाचे नाव आहे.

सचिन पवार यांच्याकडे 7 एकर कोरडवाहू जमीन आहे. पण त्या जमीनीवर पुरेसे उत्पादन निघत नव्हते. तरीदेखील त्यांनी पीकविमा भरण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पीकविमा भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने सचिन पवार निराश होते. याच नैराश्यातून सचिन यांनी किटकनाशक पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. 

या घटनेनंतर उपचारासाठी त्यांना लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सचिन यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, तीन मुली, लहान भाऊ असा परिवार आहे. दरम्यान याप्रकरणी औसा पोलिस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Young Farmer Suicide From Depression