तरुण शेतकऱ्याची  मोहा येथे आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

भीषण दुष्काळ अन्‌ अत्यल्प पावसामुळे पेरणी केलेले सोयाबीन वाया गेल्याने एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली.

कळंब (जि. उस्मानाबाद) ः भीषण दुष्काळ अन्‌ अत्यल्प पावसामुळे पेरणी केलेले सोयाबीन वाया गेल्याने एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. 20) पहाटे चारच्या सुमारास घडली.

दिलीप नरसू कसबे (वय 38, रा. मोहा, ता. कळंब) असे मृताचे नाव आहे. सततच्या नापिकीमुळे आलेल्या नैराश्‍यातून दिलीप कसबे यांनी मंगळवारी (ता.20) पहाटे चारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोहा शिवारात नरसू कसबे यांच्या नावे गट क्रमांक 222 मध्ये एक हेक्‍टर एक आर, तर त्यांची पत्नी शांताबाई यांच्या नावे गट क्रमांक 212 मध्ये एक हेक्‍टर एक आर जमीन आहे. ही जमीन दिलीप कसबे करीत होते. मात्र यंदाही पावसाअभावी पीक करपून जात असल्याच्या विवंचनेतून दिलीपने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती वडील नरसू कसबे यांनी दिल्यानंतर तलाठी श्री. पालके यांनी पंचनामा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young farmer Suicide at Moha