रिक्षातच तरुणीची छेड, उडी मारुन तिने केली सुटका

मनोज साखरे
रविवार, 29 सप्टेंबर 2019

औरंगाबाद - वेडीवाकडी वळणं घेऊन, नशेखोरी करुन रिक्षा चालवण्याचे प्रकार काही चालकांकडून होत असतानाच प्रवासी तरुणीसोबत रिक्षातच अश्‍लिल वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार 26 सप्टेंबरला चिकलठाणा येथे घडला. अशा प्रकारांमुळे महिला, तरुणींच्या सुरक्षा धोक्‍यात आली असुन खासगी प्रवासावरही प्रश्‍नचिन्ह आहे. 

सव्वीस वर्षीय तरुणीसोबत छेडछाडीचा गंभीर प्रकार घडला. ती कंपनीत नोकरी करते. काम आटोपल्यानंतर ती रात्री साडेआठला चिकलठाणा येथून रिक्षात बसली. चिकलठाणा पार केल्यानंतर तिला रिक्षात बसलेल्या रिक्षाचालकाच्या साथीदाराने मांडीवर हात ठेवून असभ्य प्रकार सुरु केला.

यामुळे तरुणीने चालकाला रिक्षा थांबवायला सांगितली. मात्र, चालकाने रिक्षा न थांबविता केंब्रिज चौकापर्यंत नेली. त्याठिकाणी रिक्षाची गती कमी झाल्याने तिने रिक्षातून उडी घेत स्वत:ची सुटका केली. या गंभीर प्रकारानंतर तिने 28 सप्टेंबरला एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young girl teasing in riksha