मळणी यंत्रात अडकून तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

वडगाव (ता. चाकूर) येथील शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनची रास करीत असताना मळणी यंत्रात अडकून एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. एक) दुपारी घडली आहे. 

चाकूर (जि. लातूर)  ः वडगाव (ता. चाकूर) येथील शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनची रास करीत असताना मळणी यंत्रात अडकून एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. एक) दुपारी घडली आहे. 

वडगाव येथील रामेश्वर घटकार (वय 25) या तरुणाने उदरनिर्वाह भागविण्यासाठी मळणी यंत्र घेतले होते. तो स्वतः यावर काम करीत होता. मंगळवारी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीनची रास करीत असताना रामेश्‍वरचा हात मळणी यंत्रात अडकला.

यासोबतच त्याचे संपूर्ण शरीर ओढले गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा यावर्षी विवाहही होणार होता.

त्याच्या पश्‍चात आई, वडील असा परिवार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. वाढोणा (ता. उदगीर) पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man dies after being trapped