नदी ओलांडताना तरुणाचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

मन्याड नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात इकळी माळ (ता. नायगाव, जि. नांदेड) येथील मारोती व्यंकटी शिळे (वय 21) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. तीन) सकाळी अकराच्या सुमारास घडली. 

नायगाव (जि. नांदेड) - मन्याड नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात इकळी माळ (ता. नायगाव, जि. नांदेड) येथील मारोती व्यंकटी शिळे (वय 21) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. तीन) सकाळी अकराच्या सुमारास घडली. 

जुना चिटमोगरा येथून बेटमोगरा जाण्यासाठी मन्याड नदी ओलांडावी लागते. पावसाने मन्याड नदीला पाणी आले होते; परंतु नेहमी चिटमोगरा येथून बेटमोगरा ये-जा करणारे काहीजण पाण्याचा अंदाज घेऊन नदीपार करत होते. नदीपात्रात अवैध वाळू उत्खननामुळे झालेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने चिटमोगरा येथून आपल्या गावाकडे निघालेल्या मारोती व्यंकटी शिळे (रा. इकळी माळ) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. चिटमोगरा गावातील श्‍याम मजगे, मारोती बोडके, तानाजी नरवाडे, गणेश मजगे, संभाजी कोकणे, गंगाधर संतावाड, ज्ञानेश्वर कोकणे, हनमंत पेन्टे आदींसह अन्य तीस ते चाळीस ग्रामस्थांनी नदीपात्रात त्याचा शोध घेतला.

मन्याड नदीवर टाकळी येथे असलेल्या बंधाऱ्याचे सर्व दरवाजे बंद करून शोध घेतला असता तब्बल सहा तासांनंतर शिळे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे आढळले. रामतीर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी सोमनाथ शिंदे व कर्मचाऱ्यांसह पंचनामा केला. मृतदेह नायगाव येथील रुग्णालयात पाठविला. मंडळ अधिकारी आर. एस. भालके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man dies in water