वाळूज : हल्लेखोर करीत होते पाठलाग, त्याने मारली इमारतीवरून उडी

आर. के. भराड
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

वाळूज (जि. औरंगाबाद) - वाद झाल्याने पाच हल्लेखोर मारण्यासाठी पाठलाग करीत असताना एक तरुण निर्माणाधीन दुमजली इमारतीवर चढला; मात्र हल्लेखोरही पाठोपाठ आले. तो त्यांच्या तावडीत सापडणार तोच त्याने दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात तो खाली लोखंडी सळ्यावर पडून गंभीर जखमी झाला.

एखाद्या चित्रपटातील कथानकासारखी ही घटना येथे शनिवारी (ता. सात) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.  विनोद बबन ढिपले (वय 20, रा. वाळूज) हा येथीलच एका कंपनीत कामगार आहे. त्याचा काही तरुणांशी वाद झाला होता. याच वादातून पाच तरुणांनी विनोदला मारहाण करण्यासाठी पाठलाग सुरू केला. त्यामुळे मारहाणीच्या धाकाने विनोद पळत होता. पळत पळत तो वाळूज येथील लांझी रस्त्यावर असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीवर चढला; मात्र त्याचा पाठलाग सुरूच होता. हल्लेखोरांच्या तावडीत सापडणार तोच विनोदने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यामुळे हल्लेखोर हातीतील लाकडी दांडके टाकून फरार झाले. उडी मारल्याने विनोद बांधकामाच्या लोखंडी सळ्यावर पडून गंभीर जखमी झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वाळूज पोलिसांनी त्याला रुग्णालयात भरती केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young man jumped on building