औरंगाबाद : सिडको उड्डाणपुलावरून तरुणाने मारली उडी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - सिडकोतील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरून उडी मारून 32 वर्षीय युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (ता. दहा) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. उमेश दत्तात्रय राजमाने (रा. एसटी कॉलनी) असे जखमी युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेशने दुचाकीवर (एमएच-28, एआर-5185) वडील दत्तात्रय राजमाने यांना एका कार्यक्रमाला सोडले. त्यानंतर मित्रांना भेटून उमेश राजमाने दुचाकीवर सिडकोतील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या मार्गाने एपीआय कॉर्नरजवळ आठच्या सुमारास पोचला. तिथे उड्डाणपुलावर दुचाकी उभी केली. त्यानंतर पेट्रोलपंपाच्या बाजूने उडी मारली. त्यावेळी त्याच्याजवळ दोरी आढळून आल्याचे उपस्थितांनी सांगितले. तिथे जमलेल्या उपस्थितांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक विकास ढाकरे यांनी उमेशची भेट घेतली. घटनेत त्याचा एक पाय फ्रॅक्‍चर झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी वडील दत्तात्रय राजमाने यांनी मुलाला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवत असल्याचे आणि त्याने हे पाऊल का उचलले याविषयी काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिसांत करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com