59 लाखांच्या आमिषापोटी गमावले सव्वा दोन लाख

file photo
file photo

औरंगाबाद - 26 : येथून 59 लाखांचे पार्सल बक्षीस म्हणून पाठविले, ते दिल्ली विमानतळावर आले असून सोडविण्यासाठी पैसे भरा, अशी थाप मारुन भामट्यांनी तरुणाची दोन लाख 21 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्टदरम्यान घडला. या प्रकरणी तीन भामट्यांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, रमेश साहेबराव घुले (वय 28 सध्या रा. मुर्तीजापुर, मुळ रा. चिंचोली लिंबाजी, कन्नड) या तरुणाने तक्रार दिली. त्यानुसार रमेश हा बीटेक फुडटेक्‍नॉलॉजीचे शिक्षण घेतो. 28 ऑगस्टला सकाळी रमेशला मोबाइलवर एका महिलेचा फोन आला. ""दिल्ली विमानतळावरून बोलत आहोत. इंग्लंड येथून तुमचे एक पार्सल आले. ते सोडवण्यासाठी तुम्हाला वाहतुक करापोटी 53 हजार 500 रुपये भरावे लागतील'' असे सांगितले. यानंतर त्याला विविध खाते क्रमांक देण्यात आले. या आमिषाला बळी पडून रमेशने सांगितलेली रक्कम भरणा केली.

मासा गळाला लागल्याने भामट्यांनी रमेशला पुन्हा फोन आला. पार्सल बॅग स्कॅन केली, त्यात 65 हजार पौंड (भारतीय चलनात 59 लाख रुपये) असल्याची थाप पुन्हा रमेशला मारली. ही रक्कम प्राप्त करण्यासाठी मनी लॉंड्रींग प्रमाणपत्राची गरज आहे. त्यासाठी एक लाख वीस हजार रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले. रमेशला विश्‍वास वाटल्याने त्याने ही रक्कम भरली. यानंतर 65 हजार पौंड ही रक्कम भारतीय चलनात बदलण्यासाठी पुन्हा 47 हजार 500 रुपये भरा, असे भामट्यांनी सांगीतले. रमेशने ही रक्कमही भरली. त्यानंतर मात्र तो संपर्क करीत असताना भामट्यांचा कॉल लागत नव्हता.

त्याने दिल्ली विमानतळावर संपर्क साधला. त्यावेळी असे कोणतेही पार्सल आले नसल्याचे रमेशला सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने ज्या खात्यात रक्कम भरली ते संशयित खातेधारक साजीद, राहूल गुप्ता, समीर अहमद यांच्याविरुद्ध तक्रार दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com