तरुणाच्या अवयवदानाने चौघांना जिवदान, दोघांना दृष्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नांदेड : ‘ब्रेन डेड’ झालेल्या भुजंग गोरखनाथ मस्के (वय ३०, रा. माळाकोळी, ता. लोहा) यांच्या कुटुंबीयांनी दुःख पचवून, मोठ्या औदार्याने अवयवदानासाठी संमती दिली. त्यानुसार बुधवारी (ता. पाच) हृदय मुंबईला, एक किडनी व लिव्हर औरंगाबादला, तर एक किडनी व डोळे नांदेडच्या गरजूंना देण्यात आले.  त्यातून चौघांना जिवदान, दोघांना दृष्टी मिळणार आहे. चौथ्या अवयवदान, अवयववाहतुकीसाठी जलदगती सुविधा (‘ग्रीन कॉरिडॉर) उपलब्ध करून देण्यात नांदेड यशस्वी झाले आहे.

माळाकोळी (ता. लोहा) येथील मूर्तिकार भुजंग गोरखनाथ मस्के हे सोलापूर
जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात असलेल्या बासलेगाव येथील मंदिराच्या
रंगरंगोटीच्या कामासाठी गेला होते. परंतु काम करत असताना (ता. २६)
नोव्हेंबरच्या दुपारी १२ वाजता त्यांचा तोल गेल्याने ते पडले. त्याच्या
डोक्याला गंभीर मार लागल्याने कंत्राटदार रमेश हरी राठोड यांनी त्याला
सोलापूर येथील अश्‍विनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची माहिती भुजंग
मस्के यांचे भाऊ संतोष मस्के यांना फोनवरून दिली. त्यामुळे ते सर्वजण
सोलापूरला गेले. तेथे प्रकृती गंभीर बनत चालल्याने नांदेडच्या यशोसाई
रुग्णालयात ता. २७ नोव्हेंबर रोजी त्यांना दाखल केले. मात्र प्रकृती
चिंताजनक बनत चालल्याने त्यांना मंगळवारी (ता. चार) ग्लोबलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणीनंतर रुग्णालय सूत्रांनी भुजंग मस्के यांचा ब्रेनडेड झाल्याचे सांगितले. या वेळी नातेवाइकांनी त्यांचे अवदान करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती डॉ. त्र्यंबक दापकेकर यांनी दिली.

आजवर झालेले अवयवदान
२० आॅक्टोबर २०१६, शासकीय रुग्णालय नांदेड ः सुधीर रावळकर (नांदेड),
हृदय-मुंबई, यकृत-पुणे, किडनी-औरंगाबाद.
२७ आॅक्टोबर २०१६, शासकीय रुग्णालय नांदेड ः संतोष उद्धव मोरे (पानशेवडी,
ता.कंधार). यकृत-मुंबई, किडनी-औरंगाबाद, डोळे-शासकीय रुग्णालय नांदेड.
२० जुलै २०१८, ग्लोबल हॉस्पीटल नांदेड ः उज्ज्वला विजय मुंदडा (परभणी),
लिव्हर-मुंबई, किडनी-औरंगाबाद, डोळे-शासकीय रुग्णालय नांदेड

Web Title: a young man organ donation gives life to 4 humans being and eyes to 2