
दरम्यान याप्रकरणी मंगळवारी (ता.२) आरोपींच्या अटकेसाठी मोरेवाडीचे संतप्त नागरिक व महिलांनी शहर पोलिस ठाण्यातच ठिय्या दिला होता.
अंबाजोगाई (जि.बीड) : जुन्या भांडणाच्या कारणावरून सोमवारी (ता.१) गणेश मोरेचा खून करण्यात आला होता. याच दिवशी रात्री उशिरा त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान याप्रकरणी मंगळवारी (ता.२) आरोपींच्या अटकेसाठी मोरेवाडीचे संतप्त नागरिक व महिलांनी शहर पोलिस ठाण्यातच ठिय्या दिला होता. घटनेची माहिती अशी, की सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोरेवाडी परिसरातील पाण्याची टाकी जवळील रस्त्यावर मारेकऱ्यांनी तलवार व दगडाच्या साहाय्याने गणेश मोरेचा निर्घृण खून केला होता.
हेही वाचा - Corona Updates: मराठवाड्यात पुन्हा ७२५ रुग्ण, आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू
याच दिवशी रात्री गणेशचे वडील सुंदर मोरे यांनी पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. जुन्या भांडणाची केस मागे का घेत नाहीस, या कारणावरून माझ्या मुलाचा तलवार, दगड व विटा मारून खून करण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्रदिप तरकसे, अमोल पौळे यांच्यासह तिघांनी खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरून पाच जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार हे करीत आहेत.
हेही वाचा - साहेब जगायचे कसे रडत की हसत? किराणामालाच्या यादीला महागाईचा फटका
दरम्यान खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी मोरेवाडी येथील संतप्त नागरिकांनी घटनेतील आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत ठाण्यातच ठिय्या दिला होता. आम्ही चार आरोपींना अटक केले आहे. फक्त एकच राहिला आहे, त्यालाही तात्काळ अटक करू असे आश्वासन अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी दिल्यानंतर हा ठिय्या मागे घेण्यात आला.