दुःख व दारिद्र्यावर मात करीत 'तो' झाला पीएसआय...

गंगाधर डांगे
गुरुवार, 21 जून 2018

मुदखेड : पोलीस निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल काल (ता.२०) लागला असून या परीक्षेमध्ये मुदखेड तालुक्यातील दोन युवक व एक युवतीने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे.

मुदखेड : पोलीस निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल काल (ता.२०) लागला असून या परीक्षेमध्ये मुदखेड तालुक्यातील दोन युवक व एक युवतीने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे.

मुदखेडपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील मेंडका (ता.मुदखेड) येथील अठराविश्व दारिद्र्य असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील युवकाने हे यश संपादन केले आहे. तीन एकर जमीन असलेल्या एका शेतकरी कुटुंबात काशिनाथ व सुमनबाई आक्कमवाड या दांपत्याच्या पोटी दोन मुले एक मुलगी जन्माला आली. अशिक्षित असलेल्या शेतकरी दाम्पत्याने आपल्या पोटाला चिमटा घेऊन तीनही लेकरांना शिक्षण शिकवण्याचा निर्धार केला. मोठ्या मुलाचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर या मुलाने मेडका येथे असलेल्या तीन एकर शेतीमध्ये आपल्या आई-वडिलांना शेतीकामात मदत करण्याचे ठरवून त्याने शेती हा व्यवसाय निवडला.

दुसरा मुलगा जो की आज पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा परीक्षा उतीर्ण झाला आहे. तो लक्ष्मण यास उच्च शिक्षण देऊन मोठा अधिकारी व्हावा अशी अपेक्षा उराशी बाळगून आई-वडिलांनी त्याचे शिक्षण बारावीपर्यंत कसेबसे केले. पुढील शिक्षणासाठी या दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मोठा हिरमोड झाला होता.

लक्ष्मणनेच आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पुढील शिक्षण मुक्त विद्यापीठातून केले व स्वबळावर पुढील शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने बारावीनंतर मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी घेतली. हा अभ्यास करीत असताना स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्याचा त्यांने मनाशी ठाम निश्चय केला. ही तयारी करीत असताना स्पर्धा परीक्षेसाठीच्या पुस्तकांचा व इतर खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न होता. या प्रश्नावर मात करण्यासाठी लक्ष्मण याने नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करण्याचे ठरवले. 

त्याने नांदेड येथे एक छोटी रूम घेऊन अभ्यास करू लागला व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी खाजगी रुग्णालयात रिसेप्शनीस्ट म्हणून रात्री नऊ ते सकाळी नऊ अशी नोकरी केली. ऐन परीक्षेच्या तोंडावर सन २०१६-१७ या वर्षांमध्ये दोन भावात एकुलते एक असलेली बहीण जी अकरावी अकरावी या वर्गात शिक्षण घेत होती. तिला कावीळ हा आजार झाला. त्याच्यातच तिला मरण आले. एकुलती एक बहीण गेल्याण दुःखाचा डोंगर या परिवारावर कोसळला होता. त्यातून  सावरत अवघ्या एक महिन्यावर असलेली परीक्षा देण्याचे ठरवले. या दुःखातून कसाबसा सावरत लक्ष्मणने थोडेही न डगमगता व खचून न जाता आपली सुरू ठेवली. या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात लक्ष्मण याने यश संपादन केले. हे यश संपादन करण्यासाठी वडील काशीनाथ, आई सुमनबाई, मोठा भाऊ रामदास, चुलत भाऊ जगदीश यांनी खूप मोठे पाठबळ दिले असल्याचे लक्ष्मण यांनी सांगीतले. 

Web Title: youth come from poor family passed psi exam