#MarathaKrantiMorcha सेलूत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

जलील पठाण
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

माने यांनी मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने त्यांची होत असलेली आर्थिक मानसिक परिस्थिती गंभीर बनली असून परिस्थितीपुढे हतबल झाल्याने व सरकारही या समाजाला आरक्षण देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पावले उचलत नसल्याने मुलाबाळांचे पालन पोषण व शिक्षण शिकविणेही अवघड होऊन बसल्याचे दुःख उराशी बाळगून गुरुवार (ता. 2) च्या रात्रीस शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  

औसा : " मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, शेती पिकत नाही, विहिरीत पाणी आहे पण ते पिकांना देण्यासाठी मोटार जळाली आहे ती दुरुस्त करण्यासाठी खिशात पैसे नाही. मोटार दुरुस्तीसाठी गावात पैसे मागितले. पण ते मिळाले नाहीत, मुलांना शिकविण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे माझ्या जगण्याला काहीच अर्थ राहिलेला नाही म्हणून जीवनाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. तरी शासनाने सर्व बाबीचा विचार करुन माझ्यासारख्या अनेक कुटुंबाना अशा घटनांपासून वाचवावे" अशी चिठ्ठी लिहून सेलु ता. औसा येथील नवनाथ निवृत्ती माने या 34 वर्षीय इसमाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सदरची घटना गुरुवार (ता.2) रोजी रात्री घडली आहे.

माने यांनी मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने त्यांची होत असलेली आर्थिक मानसिक परिस्थिती गंभीर बनली असून परिस्थितीपुढे हतबल झाल्याने व सरकारही या समाजाला आरक्षण देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पावले उचलत नसल्याने मुलाबाळांचे पालन पोषण व शिक्षण शिकविणेही अवघड होऊन बसल्याचे दुःख उराशी बाळगून गुरुवार (ता. 2) च्या रात्रीस शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  

मराठा समाजातील मागासलेपणा आणि आर्थिक विवंचनेचा उल्लेख मृत्युपूर्वी लिहिलेल्या सुसाई़ड नोटमध्ये सापडला आहे. त्यामध्ये त्यांनी आरक्षणाबरोबरच आर्थिक ओढाताणीमुळे मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत असून, कुटुंबाला शेतीचाही आधार नाही आणि मदत करणारेही कुणी नाही अशा परिस्थितीत जगणे अवघड होत असल्याने शासनाने मराठा समाजाला आरक्षण देऊन माझ्यासारख्या अनेक कुटुंबाला वाचवावे अशी अपेक्षाही सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली आहे. या घटनेचा पंचनामा औसा पोलिसांनी केला असून पुढील तपास बिट अंमलदार एन.एच. बेग हे करीत आहेत.

Web Title: Youth commits suicide in selu