बीड जिल्ह्यात युवकाची आत्महत्या, दुसऱ्या घटनेत तीन घरे फोडून लाखांचा ऐवज चोरला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

बीड जिल्ह्यातील ढोरवाडी शिवारात युवकाने आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी तीन घरे फोडून लाखांचा ऐवज चोरला असल्याची घटना घडली आहे.

वडवणी (जि.बीड) : वडवणी तालुक्यातील ढोरवाडी शिवारात एका वीस वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.२०) सकाळी अकरा वाजता घडली. भागवत छत्रभुज झोंबाडे (वय२०, रा. केसापुरी परभणी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

पावसामुळे पुलाचा भराव गेला वाहून, शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान

ढोरवाडी शिवारातील शेतातील एका लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडल्याची माहिती समजताच वडवणी येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा वडवणी पोलिस अधिक तपास करित आहेत. वडवणी तालुक्यात चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

तालुक्यातील देवडी येथे शनिवारी (ता.१९) एकाच रात्रीत तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडून सोने-चांदी नगदी पैसे असा लाखो रुपयांचा ऐवज चोरी केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. वडवणी तालुक्यातील देवडी येथे अज्ञात चोरट्यांनी रात्री एक ते तीनच्या दरम्यान शरद जालिंदर झाटे, पांडुरंग नागोराव आगे, आत्माराम लक्ष्मण शिंदे हे कुटुंब रात्री गाढ झोपेत असताना त्यांच्या घराच्या बाहेरून कड्या लावून शेजारील रूममधील नगदी ४१ हजार रुपये सोने-चांदी मिळून अंदाजे सहा लाख रुपये लंपास करून पोबारा केला.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह रुग्णवाहिकेत दहा तास पडून

सदरील कुटुंबाला आपल्या घरात चोरी झाल्याचे समजल्यावर त्यांनी याची माहिती वडवणी पोलिसांना दिली. सकाळी अकरा वाजता वडवणी पोलिसांनी पंचनामा केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल गिते व पोलीस कॉन्स्टेबल गंगावणे हे करित आहेत.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Committed Suicide In Beed District