युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पैठण शहरातील एका पंचवीसवर्षीय युवकाने येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 11) घडली. राहुल भागवत खंदारे (रा. इंदिरानगर, पैठण) असे युवकाचे नाव आहे. संत ज्ञानेश्वर उद्यानामधील नाल्यातील जांभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण शहरातील एका पंचवीसवर्षीय युवकाने येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 11) घडली. राहुल भागवत खंदारे (रा. इंदिरानगर, पैठण) असे युवकाचे नाव आहे. संत ज्ञानेश्वर उद्यानामधील नाल्यातील जांभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सदर युवकाचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याबाबत पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नामदेव कातडे तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Committed Suicide In Paithan Taluka