esakal | बिबट्याच्या हल्ल्यात पंचायत समिती सदस्य पती ठार, आष्टीच्या सुरूडी गावात दहशत.  
sakal

बोलून बातमी शोधा

bibtya nagnath.jpg

आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील घटना

बिबट्याच्या हल्ल्यात पंचायत समिती सदस्य पती ठार, आष्टीच्या सुरूडी गावात दहशत.  

sakal_logo
By
अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (बीड) : बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात तालूक्यातील सुरुडी येथील रहिवासी व सुरूडी पंचायत समिती गणाच्या सदस्या आशा नागनाथ गर्जे यांचे पती नागनाथ गहिनीनाथ गर्जे (वय34 वर्षे) हे जागीच ठार झाले. मंगळवारी (ता. 24) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


प्राप्त झालेल्या मिळालेल्या माहितीनुसार नागनाथ गर्जे हे मंगळवारी दुपारी सुरुडी येथील त्यांच्या मालकीच्या शेतातील तुरीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. अंधार पडण्याची वेळ होऊनही ते घरी परत न आल्याने गावातील काही लोक त्यांना शेतात पाहण्यासाठी गेल्यानंतर नागनाथ गर्जे हे गंभीर जखमी होऊन मृतावस्थेत कोसळलेले आढळून आले. त्यांच्या तोंडावर ओरबाडून व चावा घेतल्याने शीर धडासमवेत लोंबकळत असल्याचे आढळून आल्याचे प्रत्यक्षदर्शींना आढळून आले. घटनेची माहिती समजताच वनविभाग व पोलिस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


सुरुडी व परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे बोलले जात होते. आज घडलेल्या या घटनेने यावर शिक्कामोर्तब झाले असून यामुळे सुरुडी व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागातील अधिकार्यांनी शोधमोहीम राबवून तत्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image
go to top