पैठण तालुक्‍यात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

बालानगर (जि. औरंगाबाद) -  बालानगर (ता. पैठण) येथे उष्माघाताने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 12) घडली. शंकर भागचंद घोंगडे (वय 18) असे मृताचे नाव आहे. शंकरने नुकतीच बारावीची परीक्षा दिली. शेतीकामात तो आई-वडिलांना मदत करीत असे. त्याने सोमवारी भरउन्हात शेतात मशागतीचे काम केले. सायंकाळी घरी आल्यानंतर रात्रीचे जेवण केले; मात्र रात्री उशिरा त्याला चक्कर येऊन घाम आला. थोड्या वेळाने उलट्या सुरू होऊन ताप आला. वडिलांनी त्याला तत्काळ पैठण येथील रुग्णालयात नेले; मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्याला औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
Web Title: youth death by sunstroke