धरणात बुडून युवकाचा मृत्यू

धरणात बुडून युवकाचा मृत्यू

सोयगाव, ता. 11 (जि.औरंगाबाद) ः गोकुळ माधव सोनवणे हा तरुण तीन मित्रांसोबत बुधवारी (ता. 11) सकाळच्या सुमारास कंकराळा (ता. सोयगाव) शिवारातील झगडी या धरणाकडे मासे पकडण्यासाठी गेला असता त्याचा धरणात बुडून मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी ही घटना गावातील ग्रामस्थांना सांगितली असता घटनास्थळी धाव घेऊन तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र तरुणाचा मृतदेह सापडला नाही. सोयगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक सीताराम म्हेत्रे, तहसीलदार प्रवीण पांडे यांच्यासह बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली होती.
सदरील तरुण धरणाच्या गाळात रात्रीपासून फसलेला असून सोबतच्या तिघा मित्रांनी भीतीपोटी मृत तरुणाची माहिती गावात दिली नव्हती. दरम्यान, धरणाच्या भिंतीवर कंकराळा, जरंडी या गावांतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. गणेश विसर्जनापूर्वी कंकराळा गावात ही दुर्घटना घडली आहे.

त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झालेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) जवानांनी तासभर शोध घेतल्यानंतर मृतदेह गाळात आढळला. सोयगाव पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष पाईकराव, शिवदास गोपाळ, सागर गायकवाड तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com