नदीत बुडून युवकाचा मृत्यू

रावसाहेब काचोळे
रावसाहेब काचोळे

नाचनवेल  (जि.औरंगाबाद) ः जवखेडा खुर्द (ता. कन्नड) येथील रावसाहेब काकासाहेब काचोळे (वय 21) या युवकाचा गायीला धुताना गायीच्या हिसक्‍याने तोल जाऊन नदीत बडून मृत्यू झाला, ही घटना मंगळवारी (ता. 24) दुपारी चारच्या सुमारास अंजना नदीपात्रातील बंधाऱ्यात घडली.


रावसाहेब काचोळे हा घरातील कर्ता व अविवाहित युवक होता. दररोजच्या पावसामुळे जनावरांची सोड-बांध करताना गोठ्याच्या आत-बाहेर चिखल साचला होता. त्यामुळे गाईला नदीत नेऊन धुण्यासाठी तो गेला होता. गाय धूत असताना गायीच्या हिसक्‍यामुळे तोल जाऊन तो पाण्यात पडला, त्यानंतर गाय गोठ्याकडे परतली, पण रावसाहेब दिसत नसल्याने नदीकाठच्या व्यक्‍तीने त्याला आवाज दिला. अनेकांनी चोहीकडे शोध घेऊनही तो सापडला नसल्याने पिशोर पोलिस ठाण्याला कळविण्यात आले.

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक जगदीश पवार, जमादार अरुण गाडेकर व रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी शंकेच्या आधारे फास टाकून शोध घेतला असता नदीत मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढून नाचनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला, रात्री उशिरापर्यंत उत्तरीय तपासणी झाली नाही. पिशोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com