तरुण शेतकऱ्याची मराठवाड्यात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

केज (जि. बीड) - पीककर्ज फेडण्याच्या विवंचनेतून एका तरुण शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिंचोलीमाळी (ता. केज) येथे आज उघडकीस आली. रामेश्वर कल्याण मेहरकर (वय 28) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

रामेश्‍वर यांच्याकडे पाच एकर जमीन आहे. रामेश्वरच्या वडिलांनी चिंचोलीमाळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखेकडून एक लाख पंधरा हजार रुपयांचे पीककर्ज घेतलेले आहे; मात्र अल्प पावसामुळे खरिपाचे उत्पादन पदरात पडले नाही. नापिकीमुळे कर्ज कसे फेडायचे या नैराश्‍येतून रामेश्‍वर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Youth Farmer Suicide